सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? खाण्याची वेळ हृदयाच्या आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरते? जाणून घ्या

जेवणाची योग्य वेळ पाळणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. वेळेवर जेवण केल्यामुळे आपल्या शरीराला आराम करण्यास जास्त वेळ मिळतो. त्यामुळे हृदयासह सर्व अवयवांना त्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. एका नवीन अभ्यासात असे समोर आले आहे की, जेवणाच्या वेळेचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. या अभ्यासात २००९ ते २०२२ दरम्यान एक लाख लोकांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे हा अभ्यास अधिक विश्वसनीय वाटतो.




अभ्यासात काय सांगितले?

संशोधकांना अभ्यासात असे आढळून आले की, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण उशिरा झाले की त्याचा परिणाम हृदयाशी संबंधित आजारांवर होऊ शकतो; तर रात्री जास्त वेळ उपवास केल्यामुळे स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

दिवसाच्या सुरुवातीला नाश्त्याला उशीर केल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका दर तासाला सहा टक्क्यांनी वाढतो, तर विशेषत: महिलांमध्ये रात्री ९ नंतर जेवण केल्यामुळे स्ट्रोकसारख्या आजाराचा धोका २८ टक्क्यांनी वाढतो.

हा अभ्यास महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना पुण्यातील भारती हॉस्पिटलच्या सर्जिकल सर्व्हिसेसचे संचालक हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय नटराजन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात माहिती दिली. ते सांगतात, “रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता यामध्ये १३ तासांचे अंतर सुचविले आहे, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. काही लोकं शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी सूर्यास्तानंतर ५ ते ६ दरम्यान शेवटचे जेवण करतात.”

एका विशिष्ट वेळेपर्यंत काहीही न खाणे किंवा पिणे म्हणजेच शरीराला गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करण्याची आवश्यकता नाही. याचा हार्मोन्स संतुलनावर थेट परिणाम होतो. यामुळे अडथळा निर्माण होतात. ज्यामुळे चयापचय क्रिया, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, अति प्रमाणात रक्तातील ट्रायग्लिसराइड्स वाढणे, कोलेस्ट्रोलची एचडिएल पातळी कमी होणे इत्यादी गोष्टींवर परिणाम होतो, यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. जे अन्न आपण खातो त्यातील ग्लुकोज आपल्या शरीराला साखर पुरविते, अमिनो ॲसिड शरीराला प्रोटीन्स पुरवितात आणि फॅटी ॲसिड आपल्या शरीरात फॅट्स तयार करते. यातला ग्लुकोज हा अतिशय वाईट घटक आहे, जो रात्री उशिरा जेवण केल्यामुळे हळू हळू पसरतो; ज्यामुळे नीट पचन होत नाही. साखर एंडोथेलियल पातळी किंवा रक्तवाहिन्यांतील आतील पातळी नष्ट करते. “या एंडोथेलियलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स आणि फट्स तयार होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो”, असे डॉ. नटराजन यांनी सांगितले.

जेवणाची वेळ का महत्त्वाची आहे?

डॉ. नटराजन यांनी सांगितल्याप्रमाणे, शरीराचे वेळापत्रक पाळण्यासाठी सुरुवातीला सकाळी ८ वाजता नाश्ता आणि रात्री ८ पूर्वी जेवण करावे. रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्याच्या वेळामध्ये १३ तासाचे अंतर पाळल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसा आराम मिळतो आणि तुम्ही नाश्तासुद्धा टाळू शकत नाही. याचप्रमाणे झोपण्याची पद्धतसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. डॉ. नटराजन सांगतात, “जेव्हा तुम्ही वेळेवर झोपत नाही. तेव्हा शरीरातील ॲडिपोनेक्टिन हार्मोनची पातळी कमी होते, हे हार्मोन फॅट्स कमी करतात. याशिवाय नियमित आहाराने आपले पोट भरत नाही आणि आपण खूप जास्त एनर्जी देणारे अन्न खातो, यामुळेसुद्धा मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका यांसारख्या हृदयाशी संबंधित समस्या वाढू शकतात.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने