संक्रांतीच्या मुहूर्तावर 'नाच गं घुमा'चा चित्रीकरण आरंभ! या लोकप्रिय अभिनेत्री झळकणार

परेश मोकाशींनी २०२३ च्या सुरुवातीला 'वाळवी' सिनेमातून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं. या सिनेमाचं सगळीकडे कौतुक झालं. आता परेश मोकाशींनी २०२४ च्या सुरुवातीलाच नवीन सिनेमाची घोषणा केलीय.

तो सिनेमा म्हणजे 'नाच गं घुमा' . 'नाच गं घुमा' सिनेमाच्या शुटींगला आजपासून सुरुवात झाली असून दिग्गज अभिनेत्रींची फौज या सिनेमात दिसणार आहे.
'नाच गं घुमा' सिनेमाच्या शुटींगला सुरुवात

'नाच गं घुमा' सिनेमाच्या टीमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केलाय. या सिनेमात मुक्ता बर्वे, शर्मिष्ठा राऊत, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, आशा गोपाल, मधुगंधा कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्री झळकणार आहेत.

याशिवाय स्वप्नील जोशी या सिनेमाची निर्मिती करणार आहे. या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.

या दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार

'नाच गं घुमा' सिनेमा १ मे २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाळवी नंतर पुन्हा एकदा मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी हा सिनेमा लिहीला आहे.

परेश मोकाशी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

निर्माता स्वप्नील जोशी

'नाच गं घुमा' या सिनेमाची निर्मिती करणारा अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, "काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं ! कदाचित म्हणूनच हे धाडस ! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून एक नवीन प्रवास सुरु करतो आहे ! आईचा आशीर्वाद आहेच ! तुमचा ही असुद्या !"

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून ‘नाच गं घुमा’ सिनेमाची घोषणा झाली होती. हा सिनेमा लोकांना किती आवडणार, याचं उत्तर १ मे लाच कळेल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने