Flight: आजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरु, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती


कोल्हापूर: बहुप्रतिक्षित असणारा कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची सुरवात आजपासून होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत. त्याचबरोबर ही सेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू करण्यात येत आहे. मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे. आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे.कोल्हापूर मुंबई विमानसेवा कोरोना काळापासून बंद करण्यात आली होती. कोल्हापूर मुंबई विमानसेवेला पर्यटक विद्यार्थी आणि भविकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण कोरोना काळात कंपनीने अचानक ही सेवा बंद केली होती. त्यानंतर सेवा सुरू व्हावी अशी प्रवाशाकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. या सेवेमुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचणार आहे.कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने