अबब! डिसेंबरमध्ये पृथ्वीवर खरंच अवतरणार का एलियन? या दाव्यानं केलं साऱ्यांनाच हैराण

 दिल्ली :  एलियनचं नाव ऐकताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना एलियन्स आठवतात ते हृतिकच्या 'कोई मिल गया' या सिनेमातील. मात्र खऱ्या आयुष्यात आपल्या पृथ्वीवर एलियन येणार हे कळलं तर निश्चितच तुम्ही चकीत व्हाल. होय! आता एलियन पृथ्वीवर अवतरणार असल्याची चर्चा आहे. एका स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलरने पृथ्वीवर एलियन उतरणार असल्याचा दावा केलाय. या बातमीने सर्वच हैराण झाले आहेत.



एनो अलारिक या व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा केला आहे. एनो अलारिक स्वत: टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करतो. त्याने याबाबत टिक टॉकवर अनेक भविष्यवाण्याही केल्या आहेत. या भविष्यवाणीतील एक भविष्यवाणी म्हणजे एलियन पृथ्वीवर अवतरणार आहे. डिसेंबर महिन्यात एलियन पृथ्वीवर येऊन मानवाशी संवाद साधेल असाही दावा त्याने त्याच्या भविष्यवाणीत केलाय. तसेच त्यांच्या दाव्यानुसार एका विशाल युएफओमधून एलियन ८ डिसेंबरला पृथ्वीवर येतील.

लियनबाबत अनेक तर्क वितर्क केले जातात. शास्त्रज्ञांकडूनही यावर संशोधन सुरू आहे. पण एलियनच्या अस्तित्वाबाबत अजूनही कुठलेच पुरावे सापडलेले नाहीत. मात्र अनेक वेळा एलियनबाबत चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतात. त्यामुळे एलियन खरंच पृथ्वीवर अवतरणार आहे काय याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहातं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने