बाळासाहेबांची पुण्याई दोन्ही गटाच्या भांडणात धुळीस मिळाली; खडसेंची प्रतिक्रिया

 

मुंबई :शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बाळासाहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेच्या वाढीसाठी घालवलं होतं. त्यांनी संघर्षातून पक्षाची संघटना उभी केली होती. बाळासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा मिळाली होती. बाळासाहेबांची वर्षानुवर्ष असलेली ही पुण्याई आता ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात धुळीस मिळाली आहे असं खंडसे यांनी म्हंटलं आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने