PM मोदी स्वत: सुरक्षा कवच तोडून बाहेर आले अन्...; काय झालं पाहा

 गांधीनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा ठरणार असून त्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी आपले सुरक्षाकवच तोडलं आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असताना त्यांनी रॅली काढली होती. त्यामध्ये एक व्यक्ती त्यांची आई आणि त्याच्या फोटोची फ्रेम घेऊन उभा होता. त्याला भेटण्यासाठी मोदींनी आपले सुरक्षा कवच तोडले आणि त्याला भेटले. दरम्यान, त्या व्यक्तीने मोदींना ती फोटो फ्रेम भेट दिली आणि त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्या फ्रेमवर मोदींची सही घेतली.

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरातमध्ये असून गुजरात दौऱ्यानंतर ते मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने