सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठी झेंडा ? सरन्यायाधीश पदासाठी लळित यांनी पुढे केले हे नाव

 दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश यू. यू. लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश होणार आहेत. यू. यू. लळीत यांनी 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. त्यांचा कार्यकाल केवळ 74 दिवसांचा असून ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले आहे.



सध्या न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हेच ज्येष्ठ आहेत. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांच्याच नावाची शिफारस होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा कार्यकाल 9 नोव्हेंबर 2022 पासून 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे दोन वर्षांचा असणार आहे.

यू. यू. लळीत यांनी 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. तसेच जुने खटले तत्काळ मार्गी लागावेत म्हणून त्यांनी लिस्टिंग सिस्टम सुरू केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने