निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने ठोठावले हायकोर्टाचे दार

मुंबई : अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने आता हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. 

खरी शिवसेना कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचल्यानंतर आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती. शनिवारी ही मुदत संपल्यानंतर आयोगाने निर्णय होईपर्यंत तात्पुरतं शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला.


सोमवारपर्यंत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना पसंतीच्या ३ चिन्हाचे पर्याय देण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नव चिन्ह ठरल्याची माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या ३ चिन्हाची पसंती दिली आहे. त्यानुसार या तीन चिन्हापैकी कुठलं चिन्ह निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंच्या पक्षाला देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. अशातच ठाकरे गट आयोगाविरोधात हायकोर्टात गेल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने