तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील; सोशल मीडियावर रंगली चर्चा

मुंबई :  शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सगळ्या गदारोळात राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना वेगळ्याच सूचना दिलेल्या आहेत. मात्र, त्यांच्या सूचनेवरुन राजकीय वर्तुळाच चर्चेला उत आला आहे. राज ठाकरेंना अनेक युजर्सनी सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये, अशी सूचना दिली होती.


दरम्यान, त्यांच्या या सूचनेवरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. एका युजरने, “राजसाहेब दर सहा-आठ महिन्यांनी भूमिका बदलतात, ते पाहता उद्या मूड झालाच तर कदाचित उद्धव यांना पाठिंबा पण देऊन टाकतील. तीच एक भूमिका घेणे आता बाकी राहिले आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने