माफी मागणारे CEO अडचणीत; गैरमार्गाचा वापर व विद्यार्थ्यांच्या पिळवणुकीचा गंभीर आरोप

मुंबई:  BYJU's कंपनी त्यांच्या सीईओच्या माफीनाम्यामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. मात्र आता ही कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाने बायजूज् कंपनीला नोटीस पाठवली आहे.बालहक्क आयोगाने BYJU's चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्रन यांना नोटीस पाठवली आहे. या कंपनीने आपले कोर्सेस विकण्यासाठी विद्यार्थ्यांची पिळवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही पालकांनी या कंपनीवर हा आरोप केला आहे. या त्यांच्या कोर्सपायी अनेकांनी आपली बचत खाती मोडून ती रक्कमही कोर्सेससाठी दिली.




बायजू ही कंपनी सातत्याने ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करत होती आणि आपल्या कोर्सेससाठी त्यांना कर्जाचे करार करण्यास भाग पाडत होती. ग्राहकांची इच्छा नसल्यास त्यांना या रकमेचा रिफंडही मिळणार नाही, असाही नियम या करारात घालून देण्यात आला होता. अनेक पालक आणि मुलांनी बायजू कंपनीविरोधात तक्रारही केली, पण या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.पालक आणि मुलांना कोर्सेस खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याचे करार करण्यासाठी आमिषं दाखवणे आणि त्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर करणे, असा आरोप बायजूचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्रन यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांना २३ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी आयोगापुढे बोलवण्यात आलं आहे. यावेळी त्यांना सगळी कायदेशीर कागदपत्रे आणि कोर्सेस संदर्भातली सविस्तर माहिती प्रस्तुत करणं बंधनकारक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने