"मला माहित नव्हतं..."; जामिनावरच्या सुनावणी दरम्यान आफताबची मागणी

दिल्ली: श्रद्धा वालकर हत्या प्रकऱणातला मुख्य आरोपी आफताब अमीन पुनावाला याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी आफताब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाला होता. आपण वकिलपत्रावर सही केली, पण जामीन अर्ज दाखल करण्याबाबत आपल्याला माहिती नव्हती, असं आफताबने न्यायालयाला सांगितलं. आफताब आता वकिलांशी बोलून निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी २२ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने