मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा सर्वसामान्यांच्या मुळावर; अजब निर्णायामुळे...

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल (शुक्रवारी) रत्नागिरी दौरा होता. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी एसटी आरक्षित करण्यात आल्याने चिपळून आगारामधील तब्बल 56 फेऱ्या रद्द झाल्या होत्या. बस रद्द केल्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली आहे. झालेल्या या प्रकाराबद्दल प्रवाश्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा दौरा सर्वसामान्यांच्या मुळावर आली आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (शुक्रवारी) रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे चिपळूण आगारातील 20 एसटी बस रत्नागिरीला पाठवण्याचा परिणाम चिपळूण प्रवासी वाहतुकीवर झाला आहे. बस नसल्याचा परिणाम होऊन चिपळूण आगारातील 56 फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसुन आले.

या आधीही माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊ नका, लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले होते. प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर असतानाच औरंगाबाद ते पैठण मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसेस बंद करून त्या पाचोड सिडको मार्गे वळवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. बस पाचोड सिडको मार्गे वळवण्याच्या निर्णयामुळे प्रवाश्यांचा रस्ता दीड पटीने वाढला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने