School Bus मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; राज्यातील पहिलीच घटना

मध्य प्रदेश: आतापर्यंत तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यानं अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकली असेल, परंतु लहान मुलाच्या आकस्मिक मृत्यूमध्ये हृदयविकाराची लक्षणं पहिल्यांदाच दिसली आहेत. हे प्रकरण मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून  समोर आलंय.जिल्हा रुग्णालयात मृतावस्थेत आलेल्या मनीष जाटव या 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्यासोबत ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिंडच्या जामना रोड येथील रहिवासी कोमल जाटव यांचा मुलगा मनीष हा घरातून इटावा रोडवर असलेल्या एका खासगी शाळेत शिकण्यासाठी गेला होता. शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी तो बसमध्ये चढला असता, सीटवर बसताच तो अचानक बेशुद्ध पडला.




काय म्हणाले डॉक्टर?

जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल गोयल यांनी सांगितलं की, 'काही लोक मुलाला घेऊन रुग्णालयात आले होते. मात्र, रुग्णालयात येण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. हा अकस्मात मृत्यूचा प्रसंग होता, जो मुख्यतः हृदयविकाराच्या झटक्यानं होतो. त्यामुळं मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. एका अभ्यासात असं समोर आलंय की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना बायोपॅथी म्हणजेच ह्रदयाचा किंवा स्नायूंचा त्रास होतो, त्यामुळं हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो.'त्यानंतर बस चालकानं शाळेच्या मुख्याध्यापकांना याची माहिती दिली. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, तो शुद्धीवर न आल्यामुळं चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मनीषच्या कुटुंबीयांना तात्काळ माहिती देण्यात आली. मुलाला घेऊन व्यवस्थापन आणि कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात पोहोचलं, तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने