मोर्चा महाविकास आघाडीचा अन् चर्चा रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीची

मुंबई: महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामध्ये तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. तर या राज्यातील विविध प्रश्नांवर आज महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेल्या महामोर्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर या मोर्चात रश्मी ठाकरे सहभागी झाल्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.



दरम्यान, महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती समोर आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. तर या मोर्चामद्धे रश्मी ठाकरे यांच्या उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचं एक मोठं नेतृत्व कधीच पडद्यासमोर आलं नव्हतं.

पक्षातील त्यांचं काम आणि महत्व हे कायमच महत्वाचं राहिलं आहे. मात्र त्या कधीही कोणत्याही व्यासपीठावर उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्या कधीही व्यासपीठावर बोलताना दिसल्या नाहीत.त्या कधीच कोणत्या व्यासपीठावर बोलल्या नाहीत. आणि त्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या या मोर्चामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने