कूल मेस्सी जेव्हा भडकतो... सामन्यात 16 पिवळे कार्ड दाखवणाऱ्या पंचाला FIFA ने पाठवले घरी

कतार : फिफा वर्ल्डकप 2022 मधील पहिला सेमी फायनल सामना हा अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यामध्ये रंगाणार आहे. मात्र अर्जेंटिना आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये उडालेला वादाचा धुरळा अजून काही खाली बसताना दिसत नाहीये. या सामन्यात स्पॅनिश पंच अँटोनियो मातोओ लाऊस यांनी तब्बल 14 पिवळे कार्ड दाखवले होते. याचबरोबर एक लाल कार्ड दाखवत कहर केला होता.



यातील सर्वाधिक 8 पिवळे कार्ड हे अर्जेंटिनाविरूद्ध दाखवण्यात आले होते. त्यामुळे अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी सामन्यानंतर पंचावर जाम भडकला होता. त्याने अँटोनियो यांच्याविरूद्ध मोर्चा उघडला. याच पार्श्वभुमीवर फिफाने कारवाई केल्याचे वृत्त आले आहे. अँटोनियो यांना फिफाने कतारमधून गाशा गुंडळण्यास सांगितले आहे. यापुढील सामन्यात ते पंचगिरी करणार नाहीयेत अशी माहिती मिळत आहे.नेदरलँड्स विरूद्धचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी खूप चिडला होता. त्याने सामना झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'सामना बरोबरीत सुटल्यानंतर मला खूप राग आला होता. मी पंचाबद्दल बोलू इच्छित नाही. कारण जर बोललो तर ते त्वरित तुमच्यावर कारवाई करतील. मात्र मला वाटते की सामन्यात काय झालं ते लोकांनी पाहिलं आहे.'

मेस्सी पुढे म्हणाला की, 'जो पंच आपले काम योग्यप्रकारे करू शकत नाही, त्याला इतक्या महत्वाच्या सामन्यात पंच म्हणून नियुक्त करावे का याबाबत फिफाने विचार करायला हवा. आमच्यासाठी हा सामना चांगला झाला नाही. त्यानंतर पंचाने हा सामना एक्स्ट्रा टाईममध्ये नेला. तो कायमच आमच्या विरोधात राहिला आहे. गेल्या सामन्यात तो फाऊल नव्हता.'अँटोनियो यांनी क्वार्टर फायनल सामन्यात एकूण तब्बल 16 पिवळे कार्ड दाखवले होते. नेदरलँडच्या डेनझेल डमफायरला पेनाल्टी शूटआऊटवेळी दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे ते लाल कार्डमध्ये बदलून त्याला बाहेर काढण्यात आले. दरम्यान, मेस्सीने सामन्याच्या 73 व्या मिनिटाला मोलिनाच्या असिस्टवर गोल केला. नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाचा गोलकिपर मार्टिनेझ हिरो ठरला. त्याने नेदरलँड्सच्या पहिल्या दोन पेनाल्टी सेव्ह केल्या. त्यानंतर लाऊतोरोज मार्टिनेझने विजयी पेनाल्टी मारत सामना जिंकून दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने