आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न; शेलारांची राऊतांवर सडकून टीका

मुंबई : राज्यात महारापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकार आणि भाजपविरोधात रान उठवलं आहे.



मात्र, अशातच आता खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनीच एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ''बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला'' असं संजय राऊत म्हणाले आहेत. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळं राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळं विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवलं आहे. राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करतान मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

माध्यमांशी बोलताना आशिष शेलार  म्हणाले, 'संजय राऊतांना डाॅ. आंबेडकरांवरची दोन पुस्तकं भेट म्हणून पाठवली आहेत. त्यांनी आंबेडकरांचा संपूर्ण अभ्यास करावा आणि मगच अशी वक्तव्य करावीत. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरु आहे. ते जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. राऊतांकडून आंबेडकरांबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे.'


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने