टॉलीवूडनं बॉलीवूडचा केला 'फुटबॉल'!' टॉप 10 मध्ये एकच चित्रपट

मुंबई : बॉलीवूड चित्रपट भलेही जगभर पाहिले जात असतील मात्र भारतात यंदाच्या वर्षी बॉलीवूडची डाळ फार शिजली नाही. हे समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे. आयएमडीबीनं यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम दहा चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये एकही बॉलीवूडचा चित्रपट नाही.आयएमडीबीनं सोशल मीडियावर एक यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये त्यांनी यावर्षीच्या टॉप १० चित्रपटांची यादी दिली आहे. त्यात एकाच बॉलीवूड चित्रपटाचे नाव असल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बहुतांशी चित्रपट हे टॉलीवूडचेच आहे. पुष्पापासून विक्रमपर्यत ते चार्ली ७७७ या चित्रपटांनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षी पुष्पाचा जलवा होता. त्याचा दुसरा पार्ट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.



बॉलीवूड आणि टॉलीवूड असा वाद यंदाच्या वर्षी रंगला होता. सगळ्याच बाबतीत यावर्षी टॉलीवूडच्या चित्रपटांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. बॉलीवूडचा गंगुबाई काठियावाडी, भुलभुलैय्या २, दृष्यम २, ब्रम्हास्त्र या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यात रणबीर - आलियाच्या ब्रम्हास्त्रची चर्चा होती. मात्र चर्चा रंगते आहे ती टॉलीवूडच्या चित्रपटांची. त्यामध्ये कमल हासन. रामचरण, अल्लु अर्जुन, रामचरण, यांच्या चित्रपटांचा समावेश आहे.बॉलीवूडचा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स सोडल्यास बाकीच्या चित्रपटांमध्ये सगळेच दाक्षिणात्य चित्रपटांचा भरणा आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटावर प्रेक्षकांनी कौतूकाचा वर्षाव केला. जेवढं कौतूक तेवढीच टीकाही झाल्याचे दिसून आले. आयएमडीबीची यादी पाहिल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी आयएमडीबीनं निवडक चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये देखील बॉलीवूडपटांनी निराशा केली होती.

सर्वोत्तम १० चित्रपट आहे तरी कोणते?

सर्वोत्तम भारतीय चित्रपट २०२२ जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये विक्रम, पोन्नियन सेल्वन पार्ट वन, रॉकेट्री, आरआऱआऱ, मेजर, सीतारामन तसेच केजीएफ २, कांतारा आणिी चार्ली ७७७ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामध्ये द काश्मीर फाईल्स हा एकमेव बॉलीवूडचा चित्रपट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने