नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो काढणार? चलनी नोटांबाबत केंद्र सरकार संसदेत म्हटलं...

दिल्ली: नोटेवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे फोटो लावण्यात यावेत, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. भारतीय चलनावर एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणेशाचे फोटो असावेत, अशी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते.लोकसभेत सरकारला विचारण्यात आले की, भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या फोटोंसह आणखी फोटो लावण्याच्या मागणीबाबत सरकारला काही विनंती करण्यात आली आहे का? अशा स्थितीत या मागणीबाबत सरकारची काय योजना आहे? या प्रश्नाला उत्तर देताना श्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यसैनिकांपासून प्रतिष्ठित व्यक्ती, देवी-देवता, प्राण्यांची छायाचित्रे चलनी नोटांवर छापण्याची मागणी करण्यात आली आहे.



सरकारने संसदेत सांगितले की, भारतीय चलनी नोटांवर प्रतिष्ठित व्यक्ती, देवी-देवतांच्या आणि अगदी स्वातंत्र्यसैनिकांपासून ते प्राण्यांच्या प्रतिमा छापण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र चलनी नोटेवरून हटवण्याची सरकारची योजना नाही.अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आरबीआय कायदा 1934 च्या कलम 25 अंतर्गत, बँक नोट डिझाइन, फॉर्म आणि सामग्रीच्या वापराबाबत आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच बदल शक्य आहेत.

आरबीआयच्या वेबसाइटनुसार, बँक नोटा आणि नाण्यांच्या डिझाइन आणि स्वरूपातील बदल भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि केंद्र सरकारद्वारे ठरवले जातात. चलनी नोटांच्या रचनेत कोणताही बदल करण्यासाठी RBI च्या केंद्रीय मंडळ आणि केंद्र सरकारची मान्यता घ्यावी लागते. नाण्यांच्या रचनेत बदल करणे हा केंद्र सरकारचा विशेषाधिकार आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 चे कलम 22, RBI ला भारतात बँक नोट छापण्याचा अधिकार देते. कलम 25 नुसार, ‘बँकेच्या नोटांचे डिजाईन, रचना आणि साहित्य आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाने केलेल्या शिफारशी नंतर केंद्र सरकार मंजूर करते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने