नातंवडांसाठी अंबानी आजोबांचं प्रेम उतू, 300 किलो सोनं करणार दान

मुंबई: मुकेश अंबानी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत असतात. आज ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी आपल्या जुळ्या मुलासह भारतात आली आहे. तिच्या येण्याच्या आनंदात अंबानी कुटूंब तब्बल तीनशे किलो सोनं दान करणार आहे. ईशा आणि तिचे पती आनंद पिरामल हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात आले आहेत. त्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. एवढंच काय तर बाळांची काळजी घेण्यासाठी फ्लाईटमध्ये अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत होती.नातवंड पहिल्यांदा भारतात येत असल्याने अंबानी कुटूंब आनंदीत होतं. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी ते आज तब्बल ३०० किलो सोनं दान करणार आहे. त्यांच्या या घोषणेने सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.



अंबानी कुटूंब काय स्पेशिअल करणार?

बाळांच्या स्वागतासाठी अंबानी कुटूंबाने जय्यत तयारी केली आहे. ईशा अंबानीच्या 'करुणा सिंधू' नावाच्या घरी तब्बल एक हजार साधूसंत येणार आहेत. याचवेळी अंबानी कुटुंबं तब्बल 300 किलो सोनं दान करणार. यासोबतच अंबानी आणि पिरामल कुटुंबा एकत्र मिळून पाच अनाथाश्रम सुरु करणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी ग्रँड सेरेमनी असणार आणि या सेरेमनीत जगभरातील फेमस शेफच्या हातून पंचपक्वान्न बनविले जाणार.

अंबानी कुटूंबाने बाळांसाठी केली आहे खास व्यवस्था

अंबानीने नातंवडासाठी खास व्यवस्था केली आहे. या बाळांसाठी Hermes, Dior या इंटरनॅशनल ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी महागड्या ब्रँडचे खास कपडे बनवून घेतले आहे.एवढंच काय तर बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करुन घेतली आहे. बाळांच्या काळजीसाठी स्पेशिअल डॉक्टरची टीम असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने