भाजप, सपाला टक्कर देण्यासाठी मायावतींचा 'मास्टर प्लान' तयार; लोकसभा निवडणुकीत 'बसपा'ची लागणार कसोटी

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी  समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत यूपीच्या नागरी निवडणुकांवर  सर्वाधिक भर दिला जात आहे. यासाठी बहुजन समाज पक्षाचीही जोरदार तयारी सुरु आहे .बसपा प्रमुख मायावती  यांनी व्होट बँक एकत्र करण्यासाठी रणनीती तयार केलीये.  महापालिका निवडणुकीत दलित-मुस्लिम युतीच्या मास्टर प्लानची ​​चाचपणी करत आहे. त्यासाठी बसपापासून दूर गेलेल्या मुस्लिम मतदारांना परत आणण्यासाठी खुद्द मायावती मुस्लिमांच्या प्रश्नांवर उघडपणे बोलत आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरापासून ते जिल्हा आणि पंचायत स्तरापर्यंत मुस्लिमांना पक्षाशी जोडण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. तर, दुसरीकडं पक्षानं ब्राह्मण  समाजापासून सध्यातरी अंतर ठेवलंय.



बसपात मुस्लिमांना परत आणण्यासाठी मायावतींचे प्रयत्न

दलित, ओबीसी आणि मुस्लिम हे नेहमीच बसपाचं निवडणूक समीकरण राहिलंय. 2007 मध्ये मायावतींनी बसपामध्येही ब्राह्मणांना महत्त्व दिलं आणि पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन केलं. त्यानंतर 2012 पासून बसपाचा आलेख सातत्यानं घसरत राहिलाय. बसपानं 2017 मध्ये 99 आणि 2022 मध्ये 66 मुस्लिम उमेदवार उभे केले होते. मात्र, असं असूनही यश मिळालं नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते एका जागेपुरतं मर्यादित राहिलं. त्यानंतर बसपा प्रमुख मायावती यांनीही मुस्लिम मतं एकतर्फी सपाकडं गेल्याचं सांगितलं. पण, असं असूनही त्या मुस्लिमांना आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत.

'2024 पूर्वी मुस्लिमांना बसपाच्या गोटात आणायचंय'

बसपाला 2024 पूर्वी कोणत्याही प्रकारे मुस्लिमांना आपल्या गोटात आणायचं आहे. त्यासाठी मुस्लिम नेत्यांना पक्षाशी जोडण्याबरोबरच महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही देण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सपामध्ये गेलेले शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलंय. आझमगड पोटनिवडणुकीत त्यांना लोकसभेचे उमेदवारही करण्यात आलं होतं. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून सपामध्ये गेलेल्या इम्रान मसूद यांनी बसपमध्ये प्रवेश केलाय. पश्चिम उत्तर प्रदेशचे समन्वयक बनवण्याबरोबरच त्यांच्याकडं चार मंडळांची जबाबदारीही सोपवण्यात आलीये. आता महापालिका निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी सायमा मसूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

मुस्लिम नेत्यांचा बसपामध्ये प्रवेश

या दोघांशिवाय मुस्लिम नेत्यांना बसपामध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया विधानसभा आणि महापालिकेच्या पातळीपर्यंत सुरू आहे. एआयएमआयएमचे गोरखपूरचे अध्यक्ष इरफान मलिक यांनी आपल्या अनेक समर्थकांसह बसपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी माजी आमदार इर्शाद खान यांचा लखनौमध्ये पक्षात समावेश करण्यात आला होता. लखनौमध्येच मलिहाबाद नगर पंचायतच्या अध्यक्षा असमत आरा खान यांनीही कुटुंबासह बसपामध्ये प्रवेश केला. त्या सपाचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष अझीझ हसन खान यांच्या पत्नी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने