विचारांचं युद्ध मोठ्या पडद्यावर..चिन्मय मांडलेकर साकारणार नथुराम गोडसे

मुंबई: हिंदी सिनेमांमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे देणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी तब्बल ९ वर्षांतर इंडस्ट्रीत कमबॅक केलंय..ते देखील तडाखेबाज विषय घेऊन. 'गांधी-गोडसे एक युद्ध' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं पोस्टर त्यांनी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी रिलीज केलं आहेया पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथूराम गोडसे यांच्या व्यक्तिरेखांना समोर आणलेले आहे आणि त्या साकारणाऱ्या कलाकारांना इंट्रोड्युस केलं आहे. महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी यांनी साकारली आहे तर मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरनं नथूराम गोडसे साकारलाय. असगर वजाहतनं सिनेमाची कथा लिहिली आहे,ज्याची पटकथा राजकुमार संतोषी यांनी लिहिली आहे. सिनेमात महात्मा गांधी आणि गोडसे यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवण्यात आले आहेत.



गांधी-गोडसे एक युद्ध' हा सिनेमा २६ जानेवारी,२०२३ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. राजकुमार संतोषी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या सिनेमांचा मोठा इतिहास आहे. यामध्ये 'घायल','दामिनी','घातक' सारख्या चर्चेत राहिलेल्या सिनेमांची नावं घेता येतील.या तिन्ही सिनेमात त्यांनी सनी देओलला मध्यवर्ती भूमिकेत दाखवलं होतं. संतोषी यांचा शेवटचा सिनेमा 'फटा पोस्टर निकला हिरो' हा त्यांनी शाहिद कपूरला घेऊन केला होता. यात इलियाना डिक्रूझही दिसली होती. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारसा चालला नाही.बॉक्सऑफिसवर 'गांधी-गोडसे एक युद्ध' हा सिनेमा शाहरुखच्या 'पठाण'ला टक्कर देणार आहे. पठाण २५ जानेवारी,2023 रोजी रिलीज होत आहे, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण' स्पाय थ्रिलर आहे. यात दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने