नव्या व्हेरिएंटवर जुनी लस किती प्रभावी?; अभ्यासातून धक्कादायक खुलासे

मुंबई:भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आलेली भयानक दृश्ये आजही लोक विसरलेले नाहीत. त्यात आता पुन्हा चीनमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या BF.7 व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे.चीन, अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये BF.7 या नव्या व्हेरिएंटमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या चार बाधितांची नोंद करण्यात आली आहे.नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटमुळे अनेकांच्या मनाच प्रश्न उपस्थित झाला आहे की, यापूर्वी ज्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहे. ती या नव्या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे. याबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.



जुनी लस BF.7 वर प्रभावी होईल का?

सेल होस्ट आणि मायक्रोब जर्नलमधील स्टडीनुसार, BF.7 व्हेरिएंटविरोधात पूर्वी घेतलेल्या लसीला चकम देत शरिरात घुसून बाधित करण्यास सक्ष्हम असल्याचे सांगितले जात आहे.पूर्वीच्या लसीमुळे जरी अनेकांच्या शरिरात अँटीबॉडिज तयार झालेल्या असल्या तरी या व्हेरिएंटची लागण होऊ शकते असेही या स्पष्ट करण्यात आले आहे.कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनमध्ये R346T म्युटेशनामुळे तयार झालेल्या या व्हेरिएंटवर अँटीबॉडीज परिणाम करत नसल्याचेही समोर आले आहे.

मागील व्हेरियंटच्या तुलनेत BF.7 चा 'R' व्हॅल्यू सर्वाधिक

मागील कोरोनाच्या व्हेरिएंटपेक्षा BF.7 ची R व्हॅल्यू 10 ते 18 दरम्यान आहे. याचा अर्थ असा की, BF.7 व्हेरिएंट बाधित व्यक्ती त्याच्या आसपासच्या 10 ते 18 लोकांमध्ये संसर्ग पसरवू शकते.नव्या व्हेरिएंचा R व्हॅल्यू यापूर्वीच्या व्हेरिएंच्या तुलनेत अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे. कोरोना विषाणूच्या अल्फा व्हेरिएंटची R व्हॅल्यू 4-5 आणि डेल्टा व्हेरियंटची R व्हॅल्यू 6-7 अशी होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने