तारीख ठरली! सेना फुटीनंतर ठाकरे, शिंदे, फडणवीस पहिल्यांदाच एकाच मंचावर

मुंबई: शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमनेसामने येतील असं वाटलं होतं. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसून आलं. कारण उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमधील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते.शिंदे फडणवीस यांच्या गैरहजेरीमुळे तिघेही नेते समोरासमोर आले नाहीत. परंतु हे तिन्ही नेते आता एकाच मंचावर येणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे तिन्ही नेते एकत्र येणार का? आणि आले तर ऐकमेकांसमोर आल्यावर काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.



विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण करण्यात येणार आहे. या समारंभास प्रख्यात सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना खास पाहुणे येणार आहेत. 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.दरम्यान या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं तर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकाच मंचावर येतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने