15 मिनिटं धावलो की मलापण...; यो यो टेस्ट विरोधात गावसकरांनी उगारली बॅट

मुंबई:  बीसीसीआयने अलीकडेच टीम इंडियामध्ये निवडीसाठी यो-यो चाचणी तसेच डेक्सा स्कॅन अनिवार्य केले आहे. या दोन्ही कसोटीत पात्र ठरलेल्या खेळाडूंनाच टीम इंडियात संधी मिळेल. पण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर बीसीसीआयच्या या निर्णयाशी सहमत नाहीत.भारतीय क्रिकेट संघातील नवोदित खेळाडूंच्या निवडीसाठी यो-यो आणि डेक्सा स्कॅन फिटनेस चाचण्या अनिवार्य करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर त्यांनी टीका केली आहे. यासाठी त्यांनी त्यांचे उदाहरण दिले आहे. मग बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये बायो मेकॅनिकल आणि बॉडी सायन्स तज्ज्ञ असायला हवेत असा टोला गावसकर यांनी लगावला.



सुनील गावसकर यांनी एका वृत्तसंस्था मध्ये लिहिलं की, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शारीरिक तंदुरुस्तीची क्रेझ सुरू झाली, तेव्हा आमच्याकडे दोन माजी संघसहकारी होते जे निवृत्त झाले आणि त्या हंगामात वेगवेगळ्या मालिकांसाठी संघ व्यवस्थापक झाले. हे दोघेही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत तंदुरुस्त नव्हते.त्याचं उदाहरण देताना गावसकर यांने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा एक जुना किस्सा सांगितला की, माझी स्थिती माहीत असूनही संघ व्यवस्थापकाने मला धावायला सांगितले. मी 15 मिनिट धावलो आणि दमलो. मग मी त्यांना सांगितले की जर तो सर्वाधिक धावांच्या आधारे प्लेइंग-इलेव्हन निवडणार असेल तर मला वगळा. फिटनेस ही वैयक्तिक गोष्ट आहे. वेगवान गोलंदाजांना फिरकीपटूंपेक्षा वेगळ्या तंदुरुस्तीची आवश्यकता असते. फलंदाजांना त्याची सर्वात कमी गरज आहे. क्रिकेटचा फिटनेस सर्वात महत्त्वाचा आहे, त्याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने