वेगवान उसैन बोल्टच्या खात्यातील 100 कोटी सेकंदात झाले गायब

मुंबई : जागतील सर्वात वेगवान पुरूष अशी बुरादवली मिरवणाऱ्या उसैन बोल्टने 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 9.58 सेकंद इतकी विश्वविक्रमी वेळ नोंदवली होती. मात्र जितक्या वेगाने तो 100 मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी वेळात हुसैन बोल्टच्या अकाऊंटमधून जवळपास 100 कोटी गायब झाले आहेत.फॉर्च्युन डॉट कॉमने उसैन बोल्टच्या वकिलांचा हवाला देत लिहिले की, बोल्टच्या किंग्स्टनमधील गुंतवणूक फर्म स्टॉक् अॅन्ड सिक्युरिटीजच्या खात्यातून 12 मिलियन डॉलर (97,63,85,856 कोटी रूपये) गायब झाले आहेत. खात्यातून इतकी मोठी रक्कम गायब झाल्याने बोल्ट आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.





बोल्टचे वकील लिंटन पी. गॉर्डन यांनी फोनवर सांगितले की, 'बोल्टने नुकतेच सांगितले की त्याच्या खात्यातून जवळपास 12,000 डॉलर राहिले आहेत. बोल्टसाठी ही खूप दुःखद बातमी होती. बोल्टने हे खाते त्याच्या वैयक्तिक पेन्शनच्या रूपात उघडले होते. या खात्यातील रक्कम तो त्याच्या आई - वडिलांची पेन्शन म्हणून वापरणार होता.जमैकाच्या वित्तीय सेवा आयोगाने सांगितले की स्टॉक्स अँड सिक्युरिटीज या संस्थेत त्यांनी अस्थायी प्रशासक नेमला आहे. या वित्तीय संस्थेविरूद्ध आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान स्टॉक्स अँड सिक्युरिटीजशी या प्रकरणी त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने