किराणा दुकान चालवून साठीत केला 11 देशांचा प्रवास; असा जमवला पैसा

मुंबई:  आपल्यापैकी प्रत्येकाला जगाचा प्रवास करायचा असतो. कधी पैसा कमी पडतो तर कधी वेळ मिळत नाही. मध्यमवर्गीय परदेश दौरे करण्याचे स्वप्न पाहत असतात. पण ते पूर्ण होत नाही. मात्र किराणा दुकान चालवणारी मॉली जॉय यांनी छोट्या बचतीतून जगातील 11 देशांचा प्रवास केला आहे.त्या दोनदा युरोपला गेल्या आहे. त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्याला भेट दिली आहे. हा छंद पूर्ण करण्यासाठी त्यांनी व्यवसायातून बचत केली. पतीच्या निधनानंतर त्या खचून गेल्या होत्या. त्यांनी निराश न होता स्वतःचा छंद जोपासला.लहानपणापासूनच मॉली यांना जग फिरण्याची इच्छा होती. पण, गरिबीने त्यांना जखडून ठेवले होते. त्या केरळमधील एर्नाकुलम येथील अल्प उत्पन्न कुटुंबातील आहेत. मॉली यांना शाळेची सहलही करता आली नाही. दहावीनंतर त्यांच्या अभ्यासाला ब्रेक लागला.काही काळानंतर, त्यांचे लग्न जॉय नावाच्या व्यक्तीशी झाले. दोघांनी 1996 मध्ये किराणा दुकान उघडले होते. ते अधून मधून दक्षिण भारतात छोट्या सहलीला जात असे. जॉयला मॉली यांचा प्रवासाचा छंदही आवडला.



मॉलीच्या जगात अचानक वादळ आले...

2004 मध्ये मॉली यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. पती जॉय यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांची मुले अजूनही शिकत होती. किराणा दुकानाची संपूर्ण जबाबदारी मॉली यांच्यावर पडली. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.त्याचा परिणाम असा झाला की मुलाला परदेशात नोकरी लागली. मुलीचं लग्न झालं. यानंतर 62 वर्षीय मॉली यांच्याकडे बराच वेळ शिल्लक होता.जेव्हा त्यांना वेळ मिळाला तेव्हा मॉलीने पुन्हा आपला छंद पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिच्या पहिल्या युरोप प्रवासापूर्वी, मॉली यांची जिवलग मैत्रीण मेरीसोबत दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी फिरायला गेल्या.यामध्ये मदुराई, उटी, कोडाईकनाल, म्हैसूर यांचा समावेश होता. 2012 मध्ये त्यांनी पहिली युरोप ट्रिप केली. त्याची किंमत दीड लाख रुपये होती. गेल्या 10 वर्षात त्यांनी 10 लाख रुपये जोडून 11 देशांना भेटी दिल्या आहेत.पहिल्या युरोप दौऱ्यानंतर त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर 2017 मध्ये त्या मलेशिया आणि सिंगापूरला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतरच्या वर्षीत उत्तर भारताचा दौरा केला. 2019 मध्ये त्या दुसऱ्यांदा युरोपच्या सहलीला गेल्या.

अमेरिकेत 15 दिवस प्रवास...

लॉकडाऊन आणि साथीच्या आजारामुळे हालचालींवर निर्बंध आल्याने त्यांचा प्रवास थांबला. यामुळे त्यांना पुढील प्रवासासाठी बचत करण्याची संधी मिळाली. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांनी अमेरिकेचा दौरा केला.अमेरिकेत त्या न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी येथे गेल्या. त्यांचा हा दौरा 15 दिवसांचा होता. मॉली यांची एकच इच्छा आहे. नेहमी फिरत राहणे. त्यांना जगाचा प्रत्येक कोपरा स्वतःच्या डोळ्यांनी बघायचा आहे.2012 मधील पहिल्या ट्रिपनंतर मॉली यांना 1.5 लाख रुपये खर्च आला, मॉली यांनी पुढच्या प्रवासासाठी पैसे जमा करण्यासाठी प्रवासातून ब्रेक घेतला.त्या अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी शनिवारी आणि रविवार आणि सुट्टीच्या दिवशी देखील दुकान उघडतात. याव्यतिरिक्त, त्या चिटफंडमध्ये पैशांची गुंतवणूक करतात आणि काहीवेळा पैशासाठी सोने तारण ठेवतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने