देवेंद्र फडणवीसांचा गुढी पाडव्यानिमीत्त नव्या वर्षाचा संकल्प काय?; म्हणाले…

मुंबई: राज्यात आज गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, गिरगाव आणि नाशिक अशा विविध शहरांमध्ये भल्या पहाटेपासून लोकांनी मिरवणूका, शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलं. नागरिक मोठ्या उत्साहात गुढी पाडवा आणि हिंदू नववर्ष साजरा करत आहेत.यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरात शोभायात्रांना हजेरी लावली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



नागपूर शहरातील शोभायात्रेत सहभागी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गुढी पाडवा आणि नवं वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये गुडी पाडव्याला विशेष महत्व आहे, त्यामुळे देशवासीयांना शुभेच्छा दितो असे फडणवीस म्हणाले. उत्साह आहे कारण मागच्या वर्षी कोविडच्या सावटात यात्रा निघाली होती, आता कोविडच सावट नसल्याने लोकांचा उत्साह मोठा आहे.पुढे बोलतान नवीन सरकार आल्यानंतर पहिलाच गुडी पाडवा असल्याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, नवीन सरकार आल्याने अनेक नवीन गोष्टी घडत आहेत, संकल्प एवढाच आहे की जनसेवेकरिता जास्तीत जास्त आम्हाला इश्वराने द्यावी, आणि जनसेवेचाच संकल्प आहे. संकल्प जनसेवेचा असतो, तुम्हाला लवकरच दिसेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदेंही शोभायात्रेत सहभागी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्यातील कोपिनेश्वर मंदीर परिसरातील गुढी पाडव्यानिमीत्त आयोजित शोभायात्रेत सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गुडी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा राज्यातील जनतेला दिल्या. कोरोनामुळे निर्बंध होते पण सरकारने सर्व निर्बंध हटवले. या वर्षी गुडी पाडव्याचा उत्साह सर्वत्र दिसतोय असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.करोनामुळे गेले दोन वर्ष सणांवर निर्बंध होते. पण आपल्या सरकारने ते उठवल्यानंतर गोविंदा, दहीहंडी, गणपती, नवरात्रौत्सव, दिवाळी असे सगळे सण, उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले.आजचा गुढी पाडव्याचा उस्ताह मोठा उत्साह चेहऱ्यावर दिसतोय. यावर्षी शोभायात्रेपेचा दुप्पट उत्साह नागरिकांमध्ये दिसतोय, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने