‘मेड इन जर्मनी’! टायटॅनिकवर हिटलरनेही बनवला होता चित्रपट, पण...

मुंबई: 11 ऑस्कर पुरस्कार मिळविणारा हॉलीवूड चित्रपट ‘टायटॅनिक’ ला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. १९ डिसेंबर १९९७ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट त्या काळातला सर्वाधिक महागडा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी अवतार तसेच द टर्मिनेटर सारखे चित्रपट बनविले आहेत. या 15 एप्रिल 1912 साली ‘टायटॅनिक’ जहाज नॉर्थ अॅटलांटिक ओशनमध्ये एका हिमनगाला धडकून बुडाले होते.पण तूम्हाला माहितीय का की जेम्स यांच्या आधी जर्मनचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर यांनी टालटॅनिकवर चित्रपट बनवला होता.  समुद्रात 80 वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेवर नाझींची सत्ता असलेल्या जर्मनीनेही एका बलाढ्य जहाजाला घेऊन टायटॅनिक सिनेमा बनवला होता. पण तो सिनेमा काही मोजक्या लोकांनीच पाहिला. आणि नंतर तो बॅन करण्यात आला.



गोष्ट आहे 1942 सालची. ‘कासाब्लँका’ हा हॉलीवूडचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. नाझी विरोधी नरेटिव्हवर आधारित हा रोमँटिक सिनेमा इतका लोकप्रिय झाला की हिटलरच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. या सिनेमाच्या यशानंतर त्यांना आणखी एक प्रपोगंडा सिनेमा बनवण्यासाठी प्रेरणा मिळाली होती.पण, चित्रपट करण्याचे ठरवल्यापासूनच अनेक समस्यांचा सामना या चित्रपटाच्या टिमला करावा लागला. याचा जबर फटका दिग्दर्शक हरबर्ट सेल्पिन यांना बसला. हिटलर सरकारचे प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स यांनीच त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही दिवसांनी हरबर्ट यांनी तुरुंगात फाशी लाऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.ळी चाल खेळण्याचा विचार जर्मन अधिकाऱ्यांनी केला होता. जर्मन तूमच्यापेक्षा कमी नाही हे दाखवण्यासाठीच बलाढ्य टायटॅनिकवर तितकाच वैभवशाली चित्रपट बनवायचा विचार अडॉल्फ हिटलरने केला.या सिनेमासाठी 40 लाख रुपयांचे बजेट होते. आजच्या अमेरिकन डॉलरनुसार 18 कोटी रुपये होतात. या रकमेनुसार हा सिनेमा जगातील सर्वांत महाग सिनेमांपैकी एक होता, असे सांगण्यात येते. 

जर्मन टायटॅनिकसाठी चित्रपटासाठी बाल्टिक समुद्राच्या जर्मनीतील नौदलाच्या बेसमध्ये हे जहाज होतं. हिटलरच्या नौदलाने जहाजाचं बॅरेक केलं होतं. पण त्याच वर्षी या जहाजाला एका मोठ्या सिनेमात मोठी भूमिका मिळाली. या जहाजात आणि समुद्रात बुडालेल्या ‘आरएमएस टायटॅनिक’मध्ये बरेचसे साम्य होतं.टायटॅनिक जहाज आणि एर्कोना या जहाजात केवळ एका चिमणीचा फरक होता. टायटॅनिकमध्ये चार चिमण्या होत्या. तर एर्कोनामध्ये तीन चिमण्या होत्या. बाकी दोन्ही जहाज एकसमान होते. परंतु सिनेमाच्या शूटींगदरम्यान एर्कोनाची चर्चा बनावटी जहाज अशी होऊ लागली,” असंही प्राध्यापक सांगतात.

म्हणून बॅन केला चित्रपट

हा सिनेमा तयार होऊन प्रदर्शितही झाला. जर्मनीतील काही भागात तो दाखवण्यात आला. पण, हा चित्रपट इतका वास्तवदर्शी होता की, त्याची जर्मन अधिकाऱ्यांना भिती वाटू लागली.कारण, सिनेमातील जहाज बुडाल्याचं दृश्य इतकं खरं वाटतं की हे पाहिल्यानंतर आधीच वायू हल्ल्यामुळे घाबरलेल्या जर्मनीतील लोकांमध्ये आणखी भीतीचं वातावरण पसरेल.या सिनेमासाठी पुढाकार घेतलेले आणि त्यासाठी अमाप पैसा खर्च करणाऱ्या प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स यांनी सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला आणि त्यांनी हा सिनेमा जर्मनीत बॅन केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने