इम्तियाज जलीलांच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो; नवा वाद निर्माण

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत एआयएमआयएमने औरंगजेबाचे फोटो झळकावले. औरंगाबाद कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये कुठल्याही पक्षाचे बॅनर नाही. मात्र औरंगजेबाचे झळकवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. 




यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, "याचा मी तिव्र निषेध करत आहे. हे सर्व नाटक आहे. छत्रपती संभाजी महाराजंच्या नावाला विरोध करणे चुकीचे आहे. इम्तियाज जलील यांचा जनाधार गेलेला आहे. त्यामुळे ते असे नाटक करत आहेत. मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे हे षडयंत्र रचण्यात आले आहे. इम्तियाझ जलील यांनी त्यांच्या पोराचे नाव औरंगजेब का नाही ठेवलं. एआयएमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवावे. औरंगजेबाने मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास दिला आहे. त्यांनी मंदिरे तोडले, एवढ प्रेम जलील यांना कसे वाटायला लागले."

रावसाहेब दानवे म्हणाले, "राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात आले आहे. मराठवाड्यात नाही तर देशभरात औरंगजेब क्रूर म्हणून ओळखल्या जाते. अशा माणसाचे फोटो घेऊण कुणी आंदोलन करत असेल तर औरंगजेबाच्या पलीकडील त्यांंची वृत्ती आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण होईल. असा विरोध करणे चुकीचे आहे. यांच्यावर कारवाई झाली पाहीजे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने