राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का? CM शिंदेंचा ठाकरेंना सवाल

मुंबई:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सावरकर यांच्यावर होणारा अवमानाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच राहुल गांधीच्या थोबाडीत देण्याची हिंमत तुमच्यात आहे का असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.यावेळी ते म्हणाले, सावकरांचा राहुल गांधी वारंवार अपमान करत आहेत, बाळासाहेब ठाकरे यांनी मनीशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती, ती हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का.मागील काही दिवसांपुर्वी झालेल्या अधिवेशनात हिंदुत्ववादी नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एक ही शब्द काढला नाही. उलट राहुल गांधी यांची कायद्याने खासदारकी रद्द झाली त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून काँग्रेस सोबत आंदोनकरताना आपण हे नेते पाहिले. अस म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर टीका केली.



तर उद्धव ठाकरेंनी मालेगाव मधील सभेत केलेल्या विधानावर शिंदे म्हणाले, तुम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार आहात, उशिरा सुचलेले शहाणपण असतं त्या प्रमाणे हे बोलले गेले. फक्त बोलून काय होणार काय होणार आहे तुमच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. असं शिंदे म्हणाले. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बाबत केलेल्या विधानावरून राज्यभर सावरकर प्रेमी निषेध करत आहेत, कारण सावरकर हे देश भक्त होते, त्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, असं शिंदे म्हणाले.मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, "मी राहुल गांधी यांचा धिक्कार करतो. जनतेमध्ये या प्रकरणी तीव्र असंतोष आहे. म्हणूनच शिवसेना आणि भाजपा मिळून संपूर्ण राज्यभर सावरकर गौरव यात्रा आयोजित करत आहोत.सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात, प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आम्ही सुरू करत आहोत. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या वारंवार केलेल्या अपमानाचा आम्ही यामध्ये निषेध करू."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने