देशात पुन्हा कोरोनाचा कहर; 24 तासांत आढळले तब्बल 'इतके' नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे.आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, कोरोनाच्या नवीन रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढं गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 6,050 रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच, गुरुवारी नवीन रुग्णांची संख्या 5,335 होती.



28 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 28,303 झाली आहे. गुरुवारी देशात एकूण 25,587 सक्रिय रुग्ण होते. सक्रिय प्रकरणं सध्या एकूण प्रकरणांपैकी 0.06 टक्के आहेत.

चार दिवसांत 100 टक्के वाढ

विशेष म्हणजे, देशात गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 4 एप्रिल रोजी नवीन रुग्णांची संख्या 3,038 होती. 5 एप्रिलला नवीन रुग्णांची संख्या 4,435 वर पोहोचली. दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल रोजी कोरोनाचे 5,335 रुग्ण आले होते, तर आज 6,050 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने