भाजपला धक्क्यावर धक्के; पाचवेळा आमदार झालेल्या नेत्याचा मोठा निर्णय

कर्नाटक: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, तिकीट मिळविण्यासाठी नेते आणि आमदारांमध्ये चुरस पहायला मिळत आहे.मात्र, अशावेळी पाच वेळा भाजपचे आमदार राहिलेले हलदी श्रीनिवास शेट्टी यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केलीये. यासोबत त्यांनी आपल्या मतदारांना भाजप (BJP) उमेदवाराला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.हलदी श्रीनिवास शेट्टी हे कर्नाटकातील कुंदापुरा  येथील आमदार आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलंय. पाचवेळा आमदार झालेल्या नेत्यानं भाजप श्रेष्ठींकडं उमेदवारांच्या यादीत आपलं नाव टाकू नये, अशी विनंतीही केलीये.





निवडणूक न लढवण्याची घोषणा करताना शेट्टी म्हणाले, 'मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही आणि हा निर्णय मी स्वेच्छेनं घेतला आहे. पाच वेळा आमदार म्हणून मी माझं काम नेहमीच बांधिलकीनं केलंय आणि सामाजिक न्यायासाठी नेहमीच उभा राहिलो आहे. कुंदापुराच्या जनतेनं प्रत्येक निवडणुकीत मला आशीर्वाद दिला आणि 2013 मध्ये मी अपक्ष म्हणून उभा राहिल्यावरही मला विधानसभेत पाठवलं. जनतेच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा मी सदैव ऋणी राहीन.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने