'जॉन्सन अँड जॉन्सन'नं दिली 73,000 कोटींची ऑफर! नव्या आरोपांमुळं खळबळ

नवी दिल्ली : बळासांठी टाल्कम पावडर बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली प्रसिद्ध अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन्सवर आता नवा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीनं आपल्यावरील खटला रद्द व्हावा यासाठी मंगळवारी ८९० कोटी डॉलर अर्थात ७३,०८६ कोटी रुपयांची लाच ऑफर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यूजर्सीस्थित कंपनीच्या माहितीनुसार, हा प्रस्तावित करार आहे, ज्याची कोर्टाला दखल घ्यावी लागेल. कंपनीचं म्हणणं आहे की, कॉस्मेटिक टाल्कम पावडरबाबतचा खटल्याबाबत निर्माण झालेल्या सर्व दाव्यांचा प्रभावीपणे निपटारा करतील.



जर या कराराला कोर्टानं आणि याचिकाकर्त्यांनी अनुमोदन दिलं तर ८९० कोटी डॉलरचं पेमेंट अमेरिकेतील सर्वात मोठ्या निकाली निघणाऱ्या खटल्यांपैकी एक असेल. या पातळीवरील करार आजवर केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या कंपन्या आणि ओपिऑईड कंपन्यांच करत आल्या आहेत.

काय आरोप आहेत? आजवर काय झालंय?

जॉन्सन अँड जॉन्सन्स विरोधात हजारो खटले दाखल आहेत. यांमधून आरोप करण्यात आले आहेत की, त्यांच्या टाल्कम पावडरमध्ये ओवेरियन कॅन्सर निर्माण करणाऱ्या अॅस्बेस्टॉसचे अंश होते. कंपनीनं कधी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. पण मे २०२०मध्ये कंपनीनं अमेरिका आणि कॅनडामध्ये आपली बेबी पावडर विकणं बंद केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने