काँग्रेसचा सर्वात वाईट अध्यक्ष कोण? गुलाम नबी आझादांनी उलघडलं गुपित

दिल्ली: ज्येष्ठ राजकारणी गुलाम नबी आझादयांचं 'आत्मचरित्र' सध्या चर्चेत आहे. या पुस्तकाचं आज (बुधवार) लोकार्पण होत असलं, तरी काँग्रेसच्या  इतिहासाशी संबंधित अनेक किस्से याआधीच समोर आले आहेत.यातील एक घटना पक्षाच्या 'सर्वात वाईट' राष्ट्रीय अध्यक्षाशी संबंधित आहे. आझाद यांनी त्यांच्या पुस्तकात 1996 मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीचा उल्लेख केला आहे.त्यांनी सांगितलं की, 'के करुणाकरन यांच्या निवासस्थानी अनेक नेते एकत्र आले आणि नरसिंह राव  यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली. 



त्यावेळी त्यांनी राव यांना उघडपणे सांगितलं की, ते काँग्रेसमधील सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांपैकी एक आहेत. परंतु, ते पक्षाचे आजवरचे सर्वात वाईट अध्यक्ष होते.'आझाद पुढं म्हणाले, 'तुम्हाला संघटनेच्या कामासाठी वेळ आणि रस नाही. त्यामुळंच आमचा निवडणुकीत पराभव झाला. मी बोलत राहिलो आणि राव ऐकत राहिले, असंही त्यांनी पुस्तकात नमूद केलंय.गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यादरम्यान त्यांनी तत्कालीन हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी  यांना पाच पानी पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने