चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला! या दिल्लीवारीचं कनेक्शन अजितदादांशी?

दिल्ली : राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. राज्यात सध्या पक्ष बदलाचे वारे आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ लागले आहेत. अशातच 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येऊन गेले त्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आज तडकाफडकी दिल्लीला गेले आहेत.गेले 2 दिवस अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत होते. आज सकाळी ते नागपूरला परत आले. त्यानंतर सकाळीच ते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे दावे प्रतिदावे यांच्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.



तर राज्यातील सरकार स्थिर असल्याचं अजित पवार अधिक गांभीर्याने सांगात आहेत. त्यामुळे ते पक्षांतर करणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. अशातच भाजपचे केंद्रीय मंत्री मुंबईत होते आणि आज चंद्रशेखर बावनकुळे अचानक दिल्लीला जात आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.काल रात्री उशिरा चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात परतले, तर सकाळी ते दिल्लीला रवाना झाले. भाजपच्या मोठ्या नेत्यांची बैठक अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडली. बावणकुळे यांच्या तडकाफडकी दिल्लीला जाण्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्यांच्या नागपूरमधील कार्यालयाकडून ते दिल्लीला गेल्याच सांगण्यात आलं आहे.

काल नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यामध्ये बोलताना नेत्यांनी अनेक तर्क वितर्क लावले. तर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्व नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यात अजित पवार यांचं कनेक्शन आहे का अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.अशातच अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा काही राजकीय भूकंप होणार आहे का? राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चा खऱ्या आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने