चीन-तैवान संघर्ष पेटला! 40 चिनी लढाऊ विमानं घुसली तैवानच्या हद्दीत

बीजिंग : चीन आणि तैवान यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची  परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण, चीनची लढाऊ विमानं पुन्हा तैवानच्या हद्दीत घुसखोरी करताना दिसत आहेत. ड्रॅगननं आजपासून तैवानभोवती तीन दिवसीय लष्करी सराव सुरू केलाय.पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ईस्टर्न थिएटर कमांडनं जाहीर केलंय की, चीन इथं फक्त लष्करी सराव करत आहे. मात्र, तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन  अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर ड्रॅगननं हा निर्णय घेतला. या निर्णयावरुन चीनचा रोष म्हणून पाहायला मिळत आहे.



चीननं लष्करी कवायती सुरू केल्या असून, तैवानच्या फुटीरतावादी आणि त्यांच्याशी संलग्न बाह्य शक्तींविरुद्ध हा एक गंभीर इशारा असणार आहे. दरम्यान, सुमारे 40 चिनी लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत दाखल झाली आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, 'ते शांतपणे आणि तर्कशुद्धपणे उत्तर देतील. आम्ही वाढत्या संघर्षाला आणखी खतपाणी घालू इच्छित नाही. गेल्या 24 तासांत तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात चिनी विमानं पाहिली आहेत. तैवानच्या आसपास 13 चिनी विमानं आणि तीन युद्धनौका सापडल्या आहेत.'तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी बुधवारी लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष केविन मॅककार्थी यांची भेट घेतली. त्यामुळं चीन नाराज झाला आहे. वास्तविक, चीन तैवानला आपला भूभाग मानतो आणि त्याला कोणाचाही हस्तक्षेप नको आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने