दैवी शक्ती की विज्ञानाचं रहस्य... झऱ्याच्या खाली सतत जळत असते "आग"

न्यूयॉर्क: निसर्ग हे मायाजाल आहे. सृष्टीने इतकी सुंदर आहे की येथे प्रत्येक गोष्टी अचंबित करणाऱ्या असतात. जगात असे अनेक आश्चर्य असततात की ज्याचे प्रश्न निरुत्तर असतात. जगातील अशा काही गोष्टी ज्या एक रहस्य म्हणून समोर आलेल्या आहे ज्याला आपण दैवी शक्ती म्हणू की विज्ञानाचं रहस्य हे कळायला अवघड आहे.आज आपण अशाच एका रहस्यमय ठिकाणाविषयी जाणून घेणार आहोत. या रहस्यमय ठिकाणी पाण्याचा झरा सतत वाहत असतो पण या झऱ्याच्या थेट खाली अनेक वर्षांपासून आग जळताना दिसते. या रहस्यमय ठिकाणाविषयी जाणून घेतल्यानंतर प्रत्येकजण अचंबित असतो.



हा अनोखा झरा न्यूयॉर्कमध्ये चेस्टनट रिज काउंटी पार्कमध्ये स्थित आहे. यालाच एटरनल फ्लेम फॉल सुद्धा म्हटले जाते. या झऱ्याची खासियत म्हणजे येथे वर्षभर पाणी वाहत राहते आणि त्याखाली सतत आग जळत असते. हे दिसायला एका दैवी चमात्कारासारखं दिसतं. त्यामुळेच स्थानिक लोक याला दैवी चमत्कार मानतात.याशिवाय यासंबंधीत काही कथा सुद्धा प्रचलित आहे. असं म्हणतात की ही आग तेव्हा विझणार जेव्हा या पृथ्वीवर संकट येणार. या आगीला पाहण्यासाठी दुरवरुन लोक येतात.शास्त्रज्ञांनी झरा आणि याखालील जळत्या आगीवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. या जळत्या आगीमागे काय रहस्य आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. रिसर्चमधून शास्त्रज्ञांनी हा अंदाज लावला की मिथेन गॅसमुळे हे घडत असावं. शास्त्रज्ञांच्या मते या झऱ्याखाली गुफा आहे आणि येथून मिथेन गॅस बाहेर पडते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने