सोन्याच्या दराचा ऐतिहासिक विक्रम; चांदीच्या दरातही मोठी वाढ,

मुंबई: सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जगभरातील बाजारात गोंधळामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. फ्युचर्स मार्केट असो की स्पॉट मार्केट, आजवरच्या सर्वात महाग दराने सोने विकले जात आहे.खरं तर, अमेरिकेतील बेरोजगारी दरामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव झपाट्याने वाढला. कमकुवत डॉलर निर्देशांकाचाही त्याला पाठिंबा मिळाला, जो दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.

सोन्याची किंमत 13 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, जी 2040 प्रति औंस डॉलर आहे. त्याचप्रमाणे चांदीने 25 प्रति औंस डॉलरचा आकडा पार केला. चांदीच्या दराने एका वर्षातील उच्चांक गाठला आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमतींनी नवा विक्रम नोंदवला आहे.गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,250 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,360,रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 770 रूपये आहे. 



चेन्नई - 62,070 रुपये

दिल्ली - 61,510 रुपये

हैदराबाद - 61,360 रुपये

लखनऊ - 61,510 रुपये

मुंबई - 61,360 रुपये

पुणे - 61,360 रुपये

नागपूर - 61,360 रुपये

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने