PM मोदींच्या बाजूनं कपिल सिब्बल लढणार; नेमकं काय आहे प्रकरण?

दिल्ली: सत्तासंघर्षाच्या लढ्यात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे ज्येष्ठ वकिल सिब्बल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधक रचत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सिब्बल यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी तुमची प्रतिमा मलिन करणाऱ्यांची नावे सांगा, आपण त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करू. असे सांगितले आहे.



नेमकं प्रकरण आहे तर काय?

भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.'काही लोकांनी शपथ घेतली आहे की ते मोदींची प्रतिमा डागाळतील. यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना सुपारी दिली आहे. त्यांना आधार देण्यासाठी काही लोक देशात काम करत आहेत तर काही देशाबाहेरही काम करत आहेत.हे लोक सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोदींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आज भारतातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित हे प्रत्येक भारतीय मोदींचे सुरक्षा कवच बनले आहेत. असे मोदींनी यावेळी सांगितले होते.मोदींच्या या वक्तव्यानंतर ज्येष्ठ वकिल सिब्बल यांनी ट्विट केले आहे.

काय म्हणालेत सिब्बल?

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मोदी सांगत आहेत की, त्यांना बदनाम करण्याचा कट देशासह परदेशातही रचला जात आहे. तर मला व्यक्ती, संस्था आणि कोणत्या देशात तुमच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे त्यांची नावे सांगा. हे गुपित राहू शकत नाही. आपण त्यांच्यावर त्यांच्यावर खटला चालवू.' अशा आशयाचे ट्विट सिब्बल यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने