‘केएमटी’ दमली; नऊ हजार किलोमीटरने धाव थांबली

कोल्हापूर:  शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या केएमटीची वाटचाल कोरोनानंतर खडतर झाली आहे. बसची कमालीची घटलेली संख्या, परिणामी कमी करावे लागलेले मार्ग व फेऱ्या यामुळे कोरोनापूर्वी दररोज २३ हजार किलोमीटर धावणारी केएमटी आता १४ हजार किलोमीटरवर आली आहे. त्यामुळे उत्पन्नही दोन लाखांनी घटले. उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नसल्याने महापालिकेने अर्थसहाय्य केल्याशिवाय आता महिन्याचे पगारही होत नाहीत.



स्पेअर पार्टस्‌ नाहीत, आयुष्यमान संपल्याने ‘नॉन यूज’ कराव्या लागलेल्या तसेच बंद पडलेल्या बसमुळे ताफ्यातील कार्यरत बसची संख्या ५५ पर्यंत आली. त्यातून तसेच शहराबाहेरील मार्ग बंद करण्यासाठी झालेल्या आंदोलनामुळे चार मार्ग बंद करावे लागले आहेत. फेऱ्याही कमी केल्या. परिणामी रोजचा तोटा एक ते दोन लाखांपर्यंत वाढला आहे.बंद गाड्या दुरुस्त करून रस्त्यावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गर्दीच्या मार्गांवर जास्तीत जास्त फेऱ्या कशा होतील, हे पाहिले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने