ईडनमध्ये 'लॉर्ड' शार्दुलचे वादळ; KKR च्या विजयाची चार कारणं

मुंबई:  कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीवर 81 धावांनी विजय मिळवला. केकेआरचा ऑलराउंडर शार्दुल ठाकूर हा या विजयाचा हिरो ठरला. शार्दूलने बॅटिंग आणि बॉलिंगने अष्टपैलू कामगिरी केली.कोलकाता अडचणीत असताना रिंकू सिंहसोबत सहाव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 103 रन्सची पार्टनरशीप केली. शार्दूलने यादरम्यान आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं. तर केकेआरच्या विजयाची चार कारणं जाणून घेऊ.या सामन्यात केकेआरच्या विजयाची चार कारणं आहेत. गुरबाज रहमानउल्लाने संयमी फलंदाजी केली. त्यानंतर 'लॉर्ड' शार्दुल ठाकूरने रिंकू सिंगसोबत धडाकेबाज फलंदाजी केली. पुन्हा केकेआरच्या फिरकीपटूंनी योग्य कामगिरी केली. तीन फिरकीपटूंनी मिळून 9 विकेट घेतल्या.



कसा जिंकला KKR ने सामना?

रहमानउल्ला गुरबाजने 44 चेंडूत 57 धावांची खेळी केली. गुरबाजशिवाय टॉप ऑर्डरचे बाकीचे फलंदाज फ्लॉप ठरले. 47 धावा झाल्या असताना व्यंकटेश अय्यर, मनदीप सिंग आणि नितीश राणा बाद झाले.रिंकू सिंगने 33 चेंडूत 46 धावा केल्या. संपूर्ण डावात तो 'शीट अँकर'च्या भूमिकेत दिसला. संथ सुरुवात केली, त्यानंतर शार्दुलची खेळी पाहून त्याने वेगवान धावा केल्या.लॉर्ड' शार्दुल ठाकूरने ज्या पद्धतीने ईडन गार्डन्सवरली फलंदाजी पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ठाकूरने 29 चेंडूंत 68 धावांची खेळी खेळली, ज्यात 9 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. याआधी जोस बटलरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

केकेआरच्या गोलंदाजांसमोर आरसीबीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कोलकाताकडून उजव्या हाताचा लेगस्पिनर आणि प्रभावशाली खेळाडू सुयश शर्माने तीन बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने आरसीबीच्या चार खेळाडूंना पॅव्हेवियनचा रस्ता दाखवला.सुनील नरेनला दोन बळी मिळाले. नरेनने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. त्याचवेळी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला यश मिळाले. शार्दुल २९ चेंडूत ६८ धावा करुन बाद झाला. म्हणजेच केकेआरच्या तीन फिरकीपटूंनी आरसीबीच्या 9 क्रिकेटपटूंना आपला बळी बनवले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने