RO का खर्च परवडत नाही? मग असं करा घरच्या घरी पाणी शुद्ध

मुंबई: पाणी हे आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा घटक आहे. मानवी शरीर म्हटलं की शरीराला साधारणत: दिवसातून सात ते आठ लिटर पाणी मिळणे गरजेचे असते. हे पाणी शुद्ध असणेही तेवढेच गरजेचे आहे अन्यथा अशुद्ध पाण्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते.हल्ली दुषित पाणी टाळण्यासाठी घरोघरी RO मशीन लावली जाते पण काही सामान्य लोकांना RO खर्च परवडत नाही. अशात काही खास टिप्स वापरुन घरच्या घरी पाणी शुद्ध करू शकतात. 

पाणी उकळावे

पाणी उकळून तुम्ही घरच्या घरी पाणी शुद्ध करू शकतात. पाणी उकळ्याने पाण्यातील जर्म्स नष्ट होतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टरही आपल्याला पाणी उकळून पिण्याचा सल्ला देतात. पाणी पाच मिनिटे उकळावे, थंड झाल्यानंतर तुम्ही हे शुद्ध पाणी पिऊ शकता.



तुरटी

तुरटी फिरवून घेतेलेले पाणी शुद्ध असते. सर्वात आधी तुरटीला धुवावे त्यानंतर पाण्यात तुरटी फिरवावी. जसं पाणी पांढरं दिसायला लागेल तसं तुरटी फिरवणे थांबवावे. या तुरटीमुळे पाण्यातील जर्म्स तळाशी बसणार आणि तुम्ही वर आलेले शुद्ध पाण्याचा आस्वाद घेऊ शकणार.

क्लोरीन

पाण्याला साफ करण्यासाठी तुम्ही क्लोरीनचा वापर करू शकता. त्यासाठी मार्केटमधून क्लोरीनच्या गोळ्या विकत आणा आणि पाण्यात टाका. यामुळे पाणी शुद्ध होणार. पाण्यात गोळ्या टाकल्यानंतर त्या पाण्याला अर्ध्या तासापर्यंत वापरू नका.

टमाटर आणि सफरचंदाचे साल

टमाटर आणि सफरचंदाचे साल ही दुषित पाण्याला शुद्ध करू शकतात. टमाटर आणि सफरचंदाचे काही साल दोन तासांसाठी अल्कोहलमध्ये ठेवावे. त्यानंतर उन्हामध्ये त्यांना वाळवावे. वाळलेले साल दूषित पाण्यात टाकावे काही तासातच पाणी शुद्ध होणार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने