सावधान! आठवडाभराची अपूर्ण झोप वीकेंडला पूर्ण करताय? हृदयावर होतील गंभीर परिणाम

निरोगी आरोग्यासाठी आठ ते नऊ तास झोपण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. कारण अपुऱ्या झोपेमुळे शरीराच्या विविध कार्यांमध्येही अडथळे निर्माण होतात. पण आवश्यकतेपेक्षा अधिक वेळ झोपल्यास आरोग्यावर तितकेच गंभीर परिणाम होतात, हे आपणास माहिती आहे का? 

जास्त वेळ झोपल्याने मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांसह मृत्यू ओढावण्याचाही धोका वाढू शकतो. ज्याप्रमाणे कमी वेळ झोपणे आरोग्यासाठी हानिकारक असते, त्याचप्रमाणे जास्त वेळ झोपण्याचे तोटेच आहेत. यामुळेही तुमचे आरोग्य बिघडू शकतो. गंभीर बाब म्हणजे जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.




किती तासांची झोप घेणे आहे गरजेचं? 

शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहावे, यासाठी प्रत्येकाने सात ते नऊ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. पण धकाधकीच्या जीवनामुळे कित्येकांची झोप पूर्णच होत नाही. तर दुसरीकडे ज्या मंडळींना आठवड्यातील प्रत्येक दिवशी झोप पूर्ण करणे शक्य नसते, ते लोक वीकेंडला अपूर्ण झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. 

पण तुम्हाला माहिती आहे की या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. आठवडाभर कमी वेळ झोपणे आणि वीकेंडला जास्त वेळ झोपल्याने हृदयविकारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.

एकाग्रतेच्या क्षमतेवर होतो परिणाम   

अपूर्ण झोपेमुळे तुमची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. इतकेच नव्हे तर एकाग्रतेची क्षमताही कमी होते. आपण आळशी होऊ लागता. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी झोप मिळत नसल्याने कित्येक जण सुटीचा दिवस झोपूनच काढतात. पण यामुळे आरोग्यावर दुष्परिणामच होतात, हे लक्षात घ्या मित्रांनो.  

दररोज किमान इतक्या तासांची झोप घ्यावी

रीसर्चमधील माहितीनुसार, जी लोक रात्रीच्या वेळेस कमी तास झोपतात, त्यांना हृदयाविकारांचा सामना करावा लागू शकतो. अशा व्यक्तींचे हृदय निकामी होण्याची शक्यता वाढते. जी लोक कमी वेळ झोपतात, घोरतात, जागरण करतात, जंग फूडचे अतिरिक्त प्रमाणात सेवन करतात अशा लोकांचे हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. 

या समस्या टाळण्यासाठी आपण कमीत कमी सात तासांची पूर्ण झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. तेव्हाचे तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने