पालकांनो मुलांना टिफिनमध्ये ‘हे’ पदार्थ देणं थांबवा! वाढतोय यकृतासंबंधित ‘हा’ गंभीर आजार; डॉक्टरांनी दिल्या सूचना

भारतात मागील काही वर्षांपासून नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची समस्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. या आजारात यकृतावर अतिरिक्त चरबी जमा होते, ज्यामुळे व्यक्तीला अनेक आजारांचा धोका वाढतो. अलीकडे AIIMS च्या अभ्यासात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे भारतातील एक तृतीयांश (३८ टक्के) भारतीयांना फॅटी लिव्हर किंवा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजने त्रस्त आहेत. यातील चिंतेची बाब म्हणजे ही समस्या केवळ प्रौढांपुरतीच मर्यादित नाही तर जवळपास ३५ टक्के मुलांना याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे एनसीआरमधील (पॅन मेट्रो), इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हेपॅटोलॉजी, जीआय सर्जरी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जनच्या चेअरमन डॉ. हर्ष कपूर यांनी पालकांना मुलांना टिफिन देताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

कारण अनेक पालक मुलांना दुकानातील रेडिमेड खाद्यपदार्थ, मसालेदार पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि विशेषत: कार्बोहायड्रेट-हेवी पदार्थ टिफिनमध्ये देतात. अशाने मुलांच्या आरोग्यावर विशेषत: यकृतावर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे पालकांनी मुलांना घरच्या घरी तयार केलेले पदार्थ देणे गरजेचे आहे. याचसंदर्भात जून २०२२ मध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हेपॅटोलॉजीमध्ये एक अहवाल प्रसिद्ध झाला.




नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची (एनएएफएलडी) लक्षणे अनेकदा ओळखता येत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे दिसून येत नाहीत. पण, यकृतासंबंधित गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांमध्ये ही समस्या आणखी वाढेल. यामुळे लवकर उपचार करणे आवश्यक आहे. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमागे चार मुख्य कारणे सांगितली जातात. अनियंत्रित मधुमेह, डिस्लिपिडेमिया किंवा खराब कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा (जेव्हा तुमचे वजन तुमच्या बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआयच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असते) आणि बैठी जीवनशैली. याशिवाय व्यायामाचा अभाव, खराब आहार, तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ, मिठाई आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश होतो.

तरुणांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची काय आहेत कारणं?

कोरोनानंतर अनेकांच्या जीवनशैलीत मोठे बदल झाले.यात तरुण पिढीची जीवनशैलीत अनेकप्रकारे बदलली. यात खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल होत आहेत. यात हाय कॅलरीज पदार्थांचा वापर वाढतो आणि शारीरिक हालचाली कमी होत आहेत. यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा आणि पचन क्रियेत अडथळे येत आहेत. या सर्व कारणांमुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजची समस्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतेय.

१) पाश्चिमात्य पदार्थ

भारतातील बहुतांश तरुण पिढी पाश्चात्य पदार्थ आवडीने खात आहेत. यात रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखरयुक्त पेये अधिक प्रमाणात सेवन करत आहेत. या पदार्थांमुळे चयापचयातील बिघाड आणि यकृतामध्ये चरबी जमा

होण्याचे प्रमाण वाढतेय, तसेच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका वाढतोय. ही वाढती चरबी हिपॅटोसाइट्स नष्ट करते आणि यकृताच्या ऊतींना नुकसान पोहोचवते. हा आजार अतिशय संथ गतीने विकसित होतो, यामुळे त्याचे परिणाम तरुणात नाही तर प्रौढ वयात जाणवतात. यामुळे यकृतामध्ये गुंतागुंत निर्माण होते.

वयाच्या २० किंवा ३० मध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीचे निदान झालेल्या व्यक्तीची जीवित राहण्याची शक्यता अधिक असते. पण, त्याची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनीही आपल्या मुलांना टिफिनमध्ये बाहेरील प्रक्रिया केलेले पदार्थ, तळलेले, गोड पदार्थ देणे टाळावे.

२) लठ्ठपणा

लठ्ठपणा हा भारतातील एक चिंतेचा विषय बनत आहे. हा आजार तरुणांसह सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करत आहे. शरीराचे अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणा यांचा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजशी जवळचा संबंध आहे, कारण ते इन्सुलिन प्रतिरोधक शक्ती निर्माण करतात आणि यकृतामध्ये चरबी जमा होतात. खराब आहार आणि नियमित व्यायामाचा अभाव हे लठ्ठपणाचे कारण आहे.

३) इन्सुलिन प्रतिरोध आणि मधुमेह

भारतात टाइप २ मधुमेहाचा प्रसार वेगाने वाढत आहे आणि इन्सुलिन प्रतिरोधकता ही मधुमेहाची पूर्वसूचकता आहे. इन्सुलिन प्रतिरोधामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची शरीराची क्षमता कमी होते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. अधिक तरुण लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि मधुमेह विकसित होत असल्याने त्यांच्यात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीचचे प्रमाणदेखील वाढतेय.

४) अनुवांशिक आजार

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजच्या विकासामध्ये अनुवांशिक घटकदेखील भूमिका बजावतात. काही मुलांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमागे अनुवांशिक पूर्वस्थितीदेखील असू शकते, ज्यामुळे चयापचयातील महत्त्वपूर्ण जोखीम घटक नसतानाही ते रोगास अधिक संवेदनाक्षम बनतात.

५) जागरुकता आणि नियमित तपासणीचा अभाव

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजमध्ये बहुतेक वेळा त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसत नाहीत, ज्यामुळे वेळीच निदान होत नाही. बहुतांश तरुणांना यकृताच्या आजारांविषयी माहिती नसते, ज्यामुळे हे आजार अनेकदा चिंतेचा विषय बनतात. नियमित यकृत कार्य चाचण्या आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजबद्दल जागरूकता करणे गरजेचे आहे.

६) सामाजिक-आर्थिक घटक

हा आजार रोखण्यासाठी सामाजिक-आर्थिक घटकदेखील महत्वाची भूमिका बजावतात. जसे की आरोग्य सुविधा, शिक्षण आणि निरोगी जीवनशैली निवडीबद्दल जागरूकता निर्माण झाल्यास नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजच्या प्रसाराबाबतही लोकांना माहिती मिळेल. आरोग्यसेवा आणि आरोग्य शिक्षणातील असमानता यामुळे अनेकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातील तरुणांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे वाढत्या आजारामुळे बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य उपक्रमांमध्ये निरोगी जीवनशैलीच्या सवयींना प्रोत्साहन देणे, पौष्टिक अन्नपदार्थांच्या सेवनाबाबत जागृकता निर्माण करणे आणि नियमित शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. याव्यतिरिक्त नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजबद्दल जागरुकता वाढवणे, नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच भारतातील तरुणांमध्ये यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने