सरकारनं पुन्हा वाढवली आधार मोफत अपडेट करण्याची मुदत, UIDAI नं केली घोषणा

UIDAI नं माय आधार पोर्टलच्या माध्यमातून आधारवरील माहिती मोफत अपडेट करण्याच्या सुविधेला पुन्हा एकदा वेळ वाढवून दिला आहे. युआयडीएआयनं ११ डिसेंबरला सांगितलं की ही सुविधा तीन महीने म्हणजे १४ मार्च २०२४ पर्यंत मोफत राहील. त्यामुळे आता कोणीही myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून आधार अपडेट करू शकतो. परंतु आधार केंद्रावरून केलेल्या अपडेटसाठी २५ रुपये शुल्क आकारलं जाईल.

तुमच्याकडे १० वर्ष जुनं आधार कार्ड असेल तर ते अपडेट करणे आवश्यक आहे. सरकारकडून सुरक्षेच्या कारणास्तव १० वर्ष जुनं आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितलं जात आहे. परंतु, जर तुम्ही १० वर्षात एकदा जरी आधार कार्ड अपडेट केले असले तरी तुम्हाला आधार कार्डला अपडेट करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फोन नंबर आणि ईमेल आयडी ऑनलाइन स्वतःहून अपडेट करू शकता. तर फोटो आणि बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर जावं लागेल.




फ्री मध्ये करा अपडेट

सरकारकडून आधार अपडेट करण्यासाठी फी भरण्यास फ्री केले आहे. ही सुविधा १४ मार्च २०२४ पर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे १४ मार्च पूर्वी आधार अपडेट करून घ्या. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला १४ मार्च २०२४ नंतर आधार अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकते.

myAadhaar वेबसाइटवर माहिती कशी अपडेट करायची

  • https://myaadhaar.uidai.gov.in/ ह्या वेबसाइटवर जा.
  • तुमचा आधार नंबर टाकून लॉगिन करा आणि 'नाव/लिंग/जन्मतारीख आणि पत्ता अपडेट' चा ऑप्शन निवडा.
  • त्यानंतर 'अपडेट आधार ऑनलाइन' बटनवर क्लिक करा.
  • जी माहिती अपडेट करायची आहे ती निवडा आणि कंटिन्यू करा.
  • जी माहिती अपडेट करायची आहे त्यासाठी योग्य तो पुरावा स्कॅन करून अपलोड करा.
  • त्यानंतर एक नवीन वेबपेज ओपन होईल त्यावर 'सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (एसआरएन)' असेल जो भविष्यात तुमच्या कमी येईल.

अपडेट करताना काही समस्या आल्यास काय करावे

तुमच्या आधारावरील माहिती अपडेट करताना, पीव्हीसी कार्ड बाबत माहिती मिळवण्यासाठी किंवा एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुम्ही युआयडीएआयच्या टोल-फ्री नंबर १९४७ वर कधीही कॉल करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने