चेन्नई सुपर किंग्जने लिलावात ६ खेळाडू घेतले, १९ खेळाडू केले होते रिटेन; पाहा ‘CSK’चा संपूर्ण संघ

आयपीएल २०२४ चा लिलाव मंगळवारी दुबईत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक संघांनी मोठी बोली लावून खेळाडूंना खरेदी केले. लिलावात चेन्नई सुपर किंग्जने २० वर्षीय अनकॅप्ड समीर रिझवीला ८.४० कोटी रुपयांना विकत घेतले. समीर रिझवीला एवढी मोठी रक्कम देऊन चेन्नईने सर्वांनाच चकित केले. याशिवाय सीएसकेने १४ कोटी रुपये देऊन न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला त्यांच्या संघात सामील केले, ही त्यांची सर्वात मोठी खरेदी होती.

चेन्नईने विश्वचषकात ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या रचिन रवींद्रलाही आपल्या संघात सामील करून घेतले. सीएसकेने रचिनला १.८० कोटी रुपयांना खरेदी केले. याशिवाय भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही चेन्नई संघात सामील झाला, त्याला यलो आर्मीने 4 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहीमही चेन्नई कॅम्पमध्ये सामील झाला. मुस्तफिझूरला २ कोटी रुपये मिळाले, ही त्याची मूळ किंमत होती. तर, लिलावानंतर आयपीएल २०२४ साठी चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ कसा आहे ते जाणून घेऊया.




सीएसकेने लिलावात खरेदी केलेले खेळाडू –

चेन्नई सुपर किंग्जने २०२४ च्या आयपीएल लिलावात ६ खेळाडूंना खरेदी केले. शार्दुल ठाकूर (४ कोटी), रचिन रवींद्र (१.८० कोटी), डॅरिल मिशेल (१४ कोटी), समीर रिझवी (८.४० कोटी), मुस्तीफिजूर रहमान (२ कोटी), अरावेली अवनीश (२ कोटी).

चेन्नई सुपर किंग्जचे १९ कायम ठेवलेले खेळाडू –

अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महिश तीक्शान, महिषा पाथीराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हांगेकर, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंग, राजेंद्र हंजे, तुषार देशपांडे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने