सुधा मूर्ती म्हणतात फक्त या उपायाने वाचवले जाते लग्न, प्रेम व नाते, सांगितले संसार तुटण्यामागचे धक्कादायक कारण

काळानुसार लग्नाशी संबंधित अनेक पद्धती बदलत आहेत. लग्नाचे महत्त्व लोकांच्या जीवनात नगण्य झाले आहे. परस्पर संमतीने या पवित्र बंधनात प्रवेश करणारी जोडपी देखील या नात्याची जबाबदारी जास्त काळ पेलण्यास असमर्थ असल्याचे दिसून येते. पण यामागे काय कारण आहे याचा कधी विचार केला आहे का? तुमचे उत्तर 'नाही' असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि मोटिव्हेशनल स्पीकर लेखिका सुधा मूर्ती यांच्याकडून तुम्ही याबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊ शकता. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी आधुनिक काळातील बदलते नातेसंबंध आणि लग्न याविषयीचे त्यांचे मत इतक्या सुंदरपणे मांडले आहे की तुम्ही सुद्धा नक्कीच त्यांच्या विचारांशी सहमती दर्शवाल!




असे लग्न जास्त टिकत नाही

सुधा मूर्ती यांनी नातेसंबंधांबद्दल बोलताना सांगितले की, समाजातून अशी नाती हळूहळू कशी संपत आहेत, जी येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. त्या म्हणल्या की, आजकाल अधिकाधिक विवाह केवळ पैशाच्या जोरावर होत असून पैशाच्या किंवा गरजांवर आधारित विवाह जास्त काळ टिकू शकत नाहीत. कारण पैसा संपताच जो क्षणिक आनंद मिळतो तो दुःखात बदलतो. अशा स्थितीत लग्नाचा आधार टिकत नाही आणि घटस्फोट घेतले जातात.

लग्नात पैश्यापेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे

दोन व्यक्तींमधील प्रेमाचा आधार प्रेम असला पाहिजे. ज्यांच्या जीवनात प्रेम सर्वात महत्वाचे आहे, ते एकत्र जीवनात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतात. पैसे कमी की जास्त याने त्यांना काही फरक पडत नाही.

एकमेकांना आदर दिल्याशिवाय नाते टिकत नाही

सुधा मूर्ती सांगतात की पती-पत्नींमध्ये परस्पर प्रेम आणि आदर असणे खूप महत्वाचे आहे, तरच विवाहासारखे नाते टिकून राहते. त्यामुळे सुख असो वा दु:ख, गरिबी असो वा श्रीमंती... एकमेकांचा आदर करा, एकमेकांवर प्रेम करा. कारण चांगले आणि वाईट काळ येतात आणि जातात पण प्रेम कधीच संपत नाही.

सुरूवातीचा काळ संघर्षाचा

लग्नच नाही तर कोणत्याही गोष्टीचा सुरूवातीचा काळ हा संघर्षाचाच असतो. जशी वादळातून नौका बाहेर काढताना पाण्याचे अनेक हिंदोळे अन् धक्के तिला सहन करावे लागतात तसंच संसारात तारलं जाताना अनेक धक्के हे पचवावेच लागतात. नवरा आणि बायको दोघांसाठीही लग्नानंतरचे जीवन हे पूर्ण अनपेक्षित आणि धक्कादायक असते. यापूर्वी ते दोघेही अशा वातावरणात किंवा बदलांमध्ये राहिलेले नसतात. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत.. संघर्षाचा काळ पाहिल्याशिवाय सुखाचे दिवस दिसत नाहीत. म्हणून संयम ठेवा आणि जे येईल त्याला सामोरं जा..! हा संसार आहे एखादी परिकथा नव्हे.

एकमेकांना अपेक्षेप्रमाणे वागायला वेळ द्या

जेव्हा नवरी मुलगी सासरी जाते तेव्हा तिची अपेक्षा असते की सर्वांनी तिला समजून घ्यावं आणि सासरच्या लोकांना वाटत असतं की पहिल्या दिवसापासून तिने आपल्याच तालावर नाचावं, आपण म्हणू तसंच वागावं, आपल्याकडच्या रितीभाती आणि नियमच तिने पाळावेत. ज्यामुळे ब-याचदा कुटुंबीय राहतात बाजूला पण नवरा-बायकोमध्येच भांडणं होतात. अशावेळी एकमेकांना समजून घ्या आणि घरातील लोकांना समजावण्याची जबाबदारी मुलाने आपल्यावर घ्यावी तर नव-याला समजून घेण्याची जबाबदारी बायकोने घ्यावी. एकमेकांना अपेक्षेप्रमाणे वागायला वेळ दिला की आपोआपच बदलांची सवय लागत जाते आणि एक दिवस दोघेही एकमेकांच्या मनातलं ओळखून मन राखण्यात यशस्वी होतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने