माजी आमदार अवधूत तटकरेंचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र, हाती घेतलं कमळ.

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर अनेक नेते, आमदार, खासदार, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, यावेळी शिंदे यांनी नाही तर भाजपाने धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अवधूत तटकरे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र, नेत्यांचे शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरू असल्याचं दिसून येत आहे.अवधूत तटकरे हे ठाकरे गटाचे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर ते राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणेही आहेत. अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने