पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

पिंपरी: विजांचा प्रचंड आवाज, ढगांचा मोठा गडगडाट आणि मुसळधारी सरी अशा स्वरुपाचा पाऊस पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी रात्री अकराला सुरु झाला आहे. विजांमुळे भितीदायक वातावरण आहे. रस्त्यात जे अडकले आहेत, त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. कुठे आडोसा नाही आणि समोरचे काही दिसत नाही, अशी विचित्र परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. दिवाळी बाजारपेठेत विविध साहित्य विक्री करणारे विक्रेते आवरून घरी जाण्याच्या तयारीत असतानाच आलेल्या पावसाने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाळ्यासारखा पाऊस सुरु आहे.



पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ मंदिरात शिरले पाणी

२ तासांपासून झालेल्या या पावसामुळे पाणी मंदिरात शिरले आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.

श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयात देखील पाणी लागलं आहे.

पुणे शहर परिसरात सुरू असलेला पाऊस व त्याविषयी आत्तापर्यंत वर्दिची माहिती खालीलप्रमाणे

सोमवार पेठ परिसरात मीटर बॉक्स शॉर्टसर्किट झाला.

या परिसरात पाणी शिरले आहे

  • येवलेवाडी स्मशानभूमीजवळ

  • सुखसागर नगर, अंबामाता मंदिर

  • कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड

  • रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ

  • सुखसागर नगर, डॉल्फिन चौक

  • बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर

  • हडपसर, गाडीतळ

या परिसरात भिंतीचा भाग पडला

पर्वती, रमणा गणपतीजवळ

या परिसरात झाडपडी झाली

- हडपसर, आकाशवाणी जवळ

बिबवेवाडी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून गावठाण सह परिसरातील लाइट गेल्या पंधरा मिनिटापासून बंद पडला आहे.बी टी कवडे रस्ता परिसरात वीज पुरवठा बंद झाला असून रस्त्यावर मोठया प्रमाणावर पाणी साचले आहे.आंबेगाव, जांभूळवाडी कोळेवाडी परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. दत्तनगर जांभूळवाडी रस्त्यावरील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने