निकाल लावलाच पाहिजे...अखेर शरद पवार बोललेच

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आणि राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. या वादावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.आजारपणानंतर शरद पवार पुन्हा अक्शनमोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.जबाबदार पदावर बसून राज्यपाल सतत विधान करत आहे..याबाबत राष्ट्रपती , पंतप्रधान यांनी दखल घेतली पाहिजे. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. तसेच निकाल लावाला पाहिजे असेही पवार यावेळी म्हणाले.




नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या वक्तव्य पाहता आता त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. काल त्यांनी एक निवेदन काढत शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर सुचलेलं उशीराचं शहाणपण आहे. म्हणून मला स्वत:ला असं वाटतं की याचा निकाल हा माननीय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी लावला पाहिजे. अशी वक्तव्ये करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी देणे योग्य नाही.

काय म्हणाले होते राज्यपाल?

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शरद पवार यांनी डी. लीट पदवी बहाल केली. हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. तर यावेळी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते, गडकरी हे आत्ताच्या काळातील आदर्श आहेत असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी बोलताना केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने